धुंद मधुमती रात रे
धुंद मधुमती रात रे, नाथ रे
तनमन नाचे, यौवन नाचे
उगवला रजनीचा, नाथ रे
धुंद मधुमती रात रे, नाथ रे
जल लहरी या धीट धावती
हरित तटांचे ओठ चुंबिती
येइ प्रियकरा, येइ मंदिरा
अलि रमले कमलात रे, नाथ रे
धुंद मधुमती रात रे, नाथ रे
ये रे ये का मग दूर उभा?
ही घटिकाहि निसटुन जायची
फुलतील लाखो तारा,
परि ही रात कधि कधि ना यायची
चषक सुधेचा ओठी लावुनि
कटीभंवती धरि हात रे, नाथ रे
धुंद मधुमती रात रे, नाथ रे