मी मज हरपुन बसले
मी मज हरपुन बसलेऽ ग
आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटलेऽ ग
साखरझोपेमध्येच अलगद प्राजक्तासम टिपलेऽ ग
त्या श्वासांनी दीपकळीगत पळभर मी थरथरलेऽ ग
त्या स्पर्शाच्या हिंदोळ्यावर लाजत उमलत झुललेऽ ग
त्या नभश्यामल मिठीत नकळत बिजलीसम लखलखलेऽ ग
दिसला मग तो देवकिनंदन अन् मी डोळे मिटलेऽ ग